Sunday, September 17, 2023

मैत्रीण

एक तरी मैत्रीण अशी हवी
जरी न बघता पुढे गेले तरी
मागून आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी.....
वेळ आलीच तर आश्रू पुसणारी
स्वतःच्या घासातला घास
आठवणीने काढून ठेवणारी
वेळ प्रसंगी आपल्या वेड्या मित्राची
समजूत काढणारी.....
वाकडं पाऊल पडताना मात्र
मुस्काराट मारणारी
यशाच्या शिखरांवर
आपली पाठ थोपटणारी....
सगळ्याच्या गलक्यात
आपणास सैरभैर शोधणारी
आपणास आठवणींन
आपण नसताना व्याकुळ होणारी .....
खरंच ! अशी एक तरी जीव भावाची 
मैत्रीण ! हवी जी आपणास मैत्रीण म्हणवणारी... 
       
         
                                          चि. ओमकार आदिनाथ बडे

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home